Our Story

Abhinav Farmers’ Club is a co-operative of around 850 farmers across Maharashtra. The concept of this unique Farmers Club was developed by NABARD. We have started with growing of Indian vegetables, Cut flowers, Fruits, Milk and Dairy Product. Today, we supply exotic vegetables to some Malls, cash and carry stores, five-star hotels, and exclusive caterers across Maharashtra. All Agricultural fresh produce brought to our main branch at Pune, where it is graded, and stored at a controlled atmosphere as per requirement. The shipments are handled manually. Systemic packaging ensures that the product remains fresh and reaches its destination without any damage. We also give a lot of guidance and intensive training to the farmer in various aspects like sowing, planting, water drainage, handling, crop requirements and encourage them to use organic fertilizers. Abhinav Farmers’ club has been responsible for changing the life of many of the farmers who are part of the organization.

Testimonials

प्रचंड रासायनिक खतांचा वापर, खराब झालेली जमिनीची प्रत, लोकांचे वाढते आजार आणि शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती यावर आपणा सर्वांना मिळून उपाय काढणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी ग्राहकांना काय लागते आहे याचा अभ्यास करून तेच उगवले पाहिजे. त्यासाठी 100 % देशी गाईचे शेण, गोमूत्र व कडू लिंबाचे झाड यापासून खते, औषधे बनवून भाज्या, धान्य, व फळे यांची लागवड करून व देशी गाईचे दूध मिळवून लोकांना विषमुक्त अन्न खायला घालावयास हवे. या माध्यमातून शहरातील पैसे गावात नेऊन, शेतकरी व गावे सधन करता येतील.

यासाठी छोटे छोटे शेतकऱ्यांचे गट करून विविध प्रकारची पिके घेऊन आठवड्यात 2 ते 3 वेळा शेतीमाल पॅक हाऊसला आणून महिला बचत गटामार्फत ग्रेडिंग, पॅकिंग करून घरोघरी पोहोचविणे गरजेचे आहे. थेट विक्री केल्याने सगळा नफा शेतकरी व महिला बचत गट यांना मिळेल. शिवाय सर्वांना विषमुक्त अन्न खायला मिळाल्याने आजार कमी होऊन आरोग्यदायी आयुष्य जगता येईल. जास्तीत जास्त तरुणांना शिक्षण देऊन शेती हा एक मोठा व्यवसाय आहे आणि तो 100% फायद्याचा आहे हे शिकवायला लागेल. जगात माणसे जिवंत आहे तो पर्यंत याला मंदी किंवा बंदी येणार नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेच नाही तर साऱ्या जगाला उपाशी राहावे लागेल याची जाणीव करून द्यावी लागेल, तरच खऱ्या अर्थाने शेतकरी आत्मनिर्भर होईल.

ज्ञानेश्वर बोडके

भारतातील 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून असून त्यापैकी 60 टक्के लोकांचे घर शेती व्यवसायावर चालते शेती व्यवसायातील स्त्रियांचा सहभाग 78 टक्के इतका असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्यास शेती व्यवसायात उर्जितावस्था प्राप्त होऊ शकते. “तिच्या” कष्टाशिवाय शेती अपूर्ण आहे, याचा अर्थ शेतीतील महिला शारीरिक कष्ट करतात असे नाही तर आता स्मार्ट वर्क ही करू लागल्या आहेत. महिला शेतकरी म्हटले की “तिचे कष्टमय जीवन” हे चित्र बदलण्याची गरज आहे. यासाठी सध्याच्या महिलांनी शेतीसाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केली पाहिजेत, त्यामध्ये चार चाकी गाडी चालवणे, ऑनलाईन पेमेंट करणे व स्वीकारणे, विविध यंत्र चालवणे, संगणकाचा वापर करणे यांचा समावेश करता येईल. स्त्रियांच्या स्वतःच्या घरी शेती असल्यास नोकरीच्या मागे न धावता आधुनिकतेची कास धरून शेती करावयास हवी जेणेकरून उद्योजकता वाढीस लागेल. शेतमाल तयार करणे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षा ही त्याची योग्य दरात विक्री करणे महत्त्वाचे, यासाठी आवश्यक ज्ञान स्त्रियांनी आत्मसात केले पाहिजे. शेती करणाऱ्या महिला आर्थिक दृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण व वेग वाढवावयाला हवा

प्रिया बोडके

भारत हा तरुणांचा देश असून भारतात शेती टिकवण्याची जबाबदारी हि सर्वस्वी युवकांची आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या 50% इतकी लोकसंख्या 25 वर्षाच्या आतील असून 20 लाख तरुण नोकरीपासून प्रतिवर्षी वंचित आहेत. तरुणांनी शेती साठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून कमी श्रमात जास्त काम करणारी उपकरणे (यंत्रे) विकसित करावीत, संगणकाच्या माध्यमातून ही यंत्रे स्वयंचलित केल्यास व शेतमजूर समस्येवर मात करता येईल. पीक नियोजनाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन संगणकाद्वारे करावे जेणेकरून मागणी व पुरवठा यांचा मेळ घालता येईल. तरुणांनी शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यास व सोशल मीडियाचा वापर थेटविक्री व्यवस्थेसाठी करून शेतीपासून मिळणारे उत्पन्न वाढविता येईल.

प्रमोद बोडके

अभिनव फार्मर्स क्लब च्या माध्यमातून आपण प्रथमच “फॅमिली फार्मर्स” ही संकल्पना विकसित करतो आहोत. या माध्यमातून ग्राहकाला विषमुक्त अन्नधान्य मिळण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होईल व शेतकऱ्याला स्वतःची बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. शेती करताना अनेक निविष्ठांची गरज पडते सध्या इतर भौतिक साधनां बरोबरच कृषी तंत्रज्ञान व इतरांचे अनुभवातून मिळणारे ज्ञान हे सुद्धा महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने अभिनव फार्मर्सच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची यशोगाथा, अनुभव, नवीन तंत्रज्ञान, शेतीच्या सरकारी योजना इत्यादींची माहिती संकलित करून “ मासिका”च्या स्वरूपामध्ये सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार आहोत. अभिनव कृषी पर्यटन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक या पद्धतीने उभारण्याचा आमचा मानस असून यामधून शेतकऱ्यांना नवीन उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकेल. शेती संदर्भातील आजूबाजूच्या सर्व बदलांची आम्ही नोंद घेत असून काळानुरूप पाऊले टाकत आहोत. “शाश्वत एकात्मिक सेंद्रिय शेती व थेट पद्धतीने विक्री” व्यवस्थापनाचा प्रचार व प्रसार हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.

डॉ. प्रवीण चोळके

Register